ओव्हरटेक करतेवेळी समोरून येणाऱ्या कारची आणि दुचाकीची आमोरा समोर झालेल्या धडकेत तीन युवक ठार झाल्याची घटना बेळगाव खानापूर रोड देसुर क्रॉस जवळील प्रभू नगर जवळ घडली आहे.
घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक नारायण स्वामी दाखल झाले असून मयत झालेल्या युवकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.सकाळी पवणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला असून तिन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत युवक जैन कॉलेजचे विद्यार्थी असून बेळगावं कडून खानापूरकडे जात होते देसुर क्रॉस जवळ दुसऱ्या गाडीला ओव्हर टेक करतेवेळी आमोरा इंडिका कार ची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे.अपघात इतका भयानक होता की तिन्ही मयतांचे मृतदेह वीस फूट अंतरावर फेकले गेले होते.अपघात बघ्यांच्या गर्दीने घटनास्थळी ट्रॅफिक जॅम झाला होता मात्र ग्रामीण पोलिसांनी लागलीच धाव घेऊन ट्रॅफिक सुरळीत केलं.ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून मयतांचे मृतदेह शल्य चिकित्सेसाठी जिल्हा इस्पितळात आणले जाणार आहेत.