खासदार सुरेश अंगडी यांनी १२ जुलै पासून बेळगाव बंगळूरू ही एअर इंडियाची विमान सेवा सुरु होणार असल्याचे सुतोवाच्य केलेलं असताना बेळगावातून हवाई सफर करणाऱ्यांना दुसरी खुश खबर मिळाली आहे. एलायन्स एअरवेज बेळगाव हून बंगळूरू विमान सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली असून ११ जुलै पासूनचे तिकीट बुकिंग देखील करण्यास सुरुवात केली आहे.
एक मात्र शिल्लक असलेली स्पाईस जेटची बेळगाव बंगळूरू विमान सेवा १ जुलै पासून बंद होणार असल्याने एलायन्स एअरवेजच्या घोषणेच स्वागत केल जात आहे.सध्या मंगळवारी बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस विमान सेवा सुरु राहणार आहे.
खालील प्रमाणे विमान प्रकार आणि नंबर असणार आहेत.
ए टी आर -७२ या प्रकारचे विमान असणार आहे.
9I-513 BLR/IXG – 1540/1705 DAY- TUE
9I-514 IXG/BLR – 1735/1845 DAY- TUE
9I-513 BLR/IXG – 1410/1535 DAYS- WED & SAT
9I-514 IXG/BLR – 1605/1725 DAYS- WED & SAT(IXG म्हणजे बेळगाव )
विमाना तून प्रवास करणाऱ्यांना ही एक खुश खबर असून सदर विमान सेवा सुरु झाल्याने बेळगाव विमान तळास कुलूप लावणे बंद होणार आहे किमान आठवड्यातून तीन दिवस तरी विमान सेवा सुरु असणार आहे.१९९६ पासून एअर इंडियाची ही दुसरी विमान सेवा मार्केट मध्ये आहे देशातील ५० शहरांना विमान सेवा पुरवते यांच्याकडे फ्लाइट १४ ए टी आर-७२(७० सीटर)ए टी आर -४२ ( ४२ सीटर)अशी विमाने आहेत.त्यांची जवळपास देशात जवळपास १०२ विमाने उड्डाण करत असतात.
देशातील प्रादेशिक विमान सेवा वाढवण्याच्या हेतूने लहानात लहान शहरांना पुरवणार अशी ७२ सीट ,४२ सीटर क्षमतेची विमाने त्यांच्याकडे आहेत देशातील क्लास २ ते क्लास ३ शहरांना जोडणारी विमान सेवा असून व्हाया जयपूर,दिल्ली मुंबई,कोलकत्ता,हैद्राबाद ,बंगळूरू चेन्नई आणि विझाग शहरांना जोडते. एलायन्स एअरवेज आंतरराष्ट्रीय कनेक्शन एअर इंडियाला पुरवते. एलायन्स एअरवेज आपल्या प्रवाश्यांना साधा शाकाहारी नाश्ता पुरवते.