मध्यान्ह आहार योजनेच्या जेवणातून विषबाधा झाल्याने ६० विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गतालुक्यातील लाकनायककोप्प येथे घडली आहे.
बुधवारी दुपारी सरकारी योजनेतील जेवण केल्या बरोबर या शाळेतील ६० विध्यार्थ्यांना पोट दुखी होऊन उलट्या झाल्या आणि विध्यार्थी अत्यवस्थ झाले तत्काळ खाजगी वाहनाच्या सहाय्याने या विध्यार्थ्यांना रामदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. जेवण पुरवणाऱ्या विरुद्ध शिक्षक आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.