गोगटे सर्कल ते खानापूर रोडवर बांधले जात असलेले नवे ओव्हरब्रिज यांना फ्लाय ओव्हर ने जोडले जाणार अशी चर्चा जोरात सुरू आहे. या फ्लायओव्हर चा आराखडा विद्यार्थ्यांनी बनविला आहे.भरतेश पॉलिटेक्निक च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थी गटाने हा नवा आराखडा तयार केला आहे.
बेळगाव ते पणजी ला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र ४ ए बेळगाव शहरातून जातो. या महामार्गाची सुरुवात खानापूर रॉड वरून होते. या भागात रहदारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फक्त नागरी वाहतूक नव्हे तर गोवा कडे लागणाऱ्या गरजू वस्तूंची वाहतूकही याच रस्त्याने होते. यामुळेच या विद्यार्थ्यांनी या फ्लाय ओव्हर चा पर्याय सुचवला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सुरू होऊन थेट नव्या ओव्हर ब्रिज ला जोडणाऱ्या फ्लायओव्हर चा आराखडा तयार करून त्यांनी तो खासदार सुरेश अंगडी व आमदार अनिल बेनके यांच्याकडे सादर केला आहे.
या विद्यार्थी समूहाने रहदारी पोलीस, बस ड्रायव्हर, रिक्षा चालक, कार चालक, मोटारसायकल चालक आणि इतर अनेक मंडळींशी चर्चा केली आहे.
प्रस्तावित फ्लाय ओव्हर एकूण लांबी ४२७ मीटर आहे यात ६० मीटरचे जंक्शन असून ग्रेड रस्त्यांची रुंदी ७.५ मीटर आहे फुटपाथ आणि ड्रीनेज ची देखील सोय या प्रस्तावित ब्रिज च्या रस्त्यावर केलेली आहे. इतर वेगवेगळ्या उद्देश्याने हा प्रस्तावित उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे.अभिषेक मालजी, अतुल बेळगुंदकर, नाग्यास्वामी हट्टी, शुभम मालजी यांनी राजू मन्नोळकर या आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा बनवला आहे.
Superb ?? smart plan well done my frnd Abhishek