सूत्रांनी दिलेली बातमी खरी ठरली तर बेळगाव येथे आता अलायन्स एअर वेज दाखल होण्याची शक्यता आहे.
जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापासून अलायन्स चे विमान आठवड्यात तीन वेळा बेळगाव बंगळूर धावणार आहे.
जुलै १ पासून स्पाईस जेट आपली सेवा थांबवणार आहे. ५ मे पर्यंत स्पाईस जेट च्या पाच सेवा बेळगावला होत्या. उडान योजनेतून हुबळीला रूट मिळाले आणि स्पाईस जेटने बेळगावला डावलले. शेवटी बेळगाव बंगळूर ही एक सेवा ठेवली होती पण तीही बंद होणार आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या कंपनी तांत्रिक समस्या आल्याने बेळगावला येऊ शकल्या नाहीत. एअर इंडियाला मुंबई आणि बंगळूर विमानतळावर स्लॉट मिळाले नाहीत तर इंडिगो कडे विमानांची कमतरता आहे.
यामुळे सध्या अलायन्स एअर वेज वर भर दिला जात आहे.हुबळीत जो राजकीय दबाव आहे तो बेळगावात नाही यामुळे आता दबाव वाढण्याची गरज आहे.सध्या बेळगाव विमान तळावरून केवळ बेळगाव बंगळुरू अशी एकमेव हवाई सेवा सुरू आहे एकेकाळी दररोज पाच पाच विमान येणार बेळगाव विमान तळ सध्या स्थितीत कोरडे पडल्याची स्थिती आहे.अनेक संघ संस्थानी प्रभारी नागरी विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घालून बेळगाव विमान तळाचा उड्डाण योजनेत समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.