Wednesday, January 8, 2025

/

‘श्‍वेतप्रदर’-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum
स्त्रियांच्या जननेंद्रियातून पांढरट रंगाचा स्राव उत्पन्न होतो यालाच श्‍वेतप्रदर किंवा अंगावरून पांढरे जाणे असे म्हणतात. थोड्या प्रमाणात असा स्राव असणे किंवा किंचित ओलसरपणा असणे हे नैसर्गिक मानले जाते. परंतु प्रमाणापेक्षा जास्त त्रास असल्यास खचितच अनैसर्गिक असते. ही अवस्थाकाही आठवडे किंवा काही महिने चालू राहू शकते. नैसर्गिकर्‍यिा पाळीच्या चौदाव्या, पंधराव्या दिवशी (स्त्री बीज उद्यपीत होण्यावेळी) मासिक पाळीच्या आीध चार दिवस, गरोदरपणामध्ये या स्रावामध्ये वाढ दिसून येते. यावर कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते. परंतु इतर प्रकारच्या श्‍वेत स्रावासाठी उपचार आवश्यक असतात.
कारणे- गर्भाशयासंबंधीच्या विकारांमुळे, गर्भाशयाला, स्त्री बीज ग्रंथींना किंवा बीजवाहक, नलिकांना सूज आल्यामुळे किंवा जंतूसंसर्गामुळे श्‍वेतस्राव होऊ शकतो. गर्भाशय व जननमार्ग यांच्या श्‍वेष्मल आवरणातून हा द्राव पाझरतो. काही स्त्रियांमध्ये प्रसूतीच्यावेळी गर्भाशयाचे तोंड वाकडे तिकडे झाल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे जंतूसंसर्ग वारंवार होत राहतो. यामुळे पिवळट हिरवा स्राव होतो. काहीवेळा गर्भाशय मूळ जागेवरून खाली सरकल्यामुळे पातळ पाण्यासारखा स्राव होतो. अस्वच्छतेमुळे जंतूसंसर्ग होण्याचे प्रमाण सगळ्या कारणांपेक्षा जास्त आहे. स्त्री पुरूष संबंधामधूनही कैक प्रकारचे संसर्ग होऊन श्‍वेतप्रदर होऊ शकतो.
काहीवेळा गर्भाधारणा रोखण्यासाठी बसवलेल्या कॉपर टी, लूप अशा साधनांमुळे गर्भाशयाचे मुख जरासे उघडे राहिल्यास योनीमार्गाव्दारे जंतूसंसर्ग गर्भाशयात पोहोचतो व तीव्र स्वरूपाच्या श्‍वेतस्रावाला सुरूवात होते.
लक्षणे- श्‍वेतस्राव चालू झाला की अशक्तपणा जाणवतो. थकवा येतो ओटीपोटात व कटीप्रदेशात वेदना होतात. ओटीपोटात जडपणा येतो. बध्दकोष्ठता, डोकेदुखी, बाह्यइंद्रियाला खाज येणे, दुखणे ही इतर किंवा पाण्यासारखा असणे, विशिष्ट विचित्र वास येणे, संबंधानंतर ओटीपोटात दुखणे, किंचित ताप येणे अशी लक्षणे जाणवू लागतात. व्यवस्थित निदान होण्यासाठी अल्ट्रसोनोग्राफी, स्रावाची तपासणी, रक्ततपासणी  आवश्यक असते.
उपचार
होमिओपॅथी- अशा अनेक रूग्णस्त्रिया आहेत ज्यांना होमिओपॅथीव्दारे अक्षरशः संपूर्ण आरोग्यदान मिळाले आहे. श्‍वेतप्रदर या विकारावर अनेक इंग्लीश औषधे घेऊन काहीही फरक न दिसणे, क्वचित इतरच काही त्रास होणे याला कंटाळून होमिओपॅथी उपचार घेणार्‍यांना विनासायास राहत मिळू शकते. आजकल होमिओपॅथीची उपयुक्तता पाहुन अ‍ॅलापॅथीचा अवलंब न करता थेट फक्त्त होमिओपॅथिक उपचार घेणार्‍या कुटूंबाची संख्या वाढतेच आहे व खर्‍या अर्थाने होमिओपॅथीक तज्ज्ञ फॅमिली डॉक्टरची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.
अ‍ॅब्रोमा ऑगस्टा- मधुमेह असणार्‍या स्त्रियांना श्‍वेतप्रदराचा त्रास होत असल्यास उपयुक्त. पांढरट पिवळा स्राव, वेळी अवेळी होणारे मासिक रक्तावर्त (पाळी), श्रम केल्याने जास्त स्राव होणे, आराम केल्यावर स्राव कमी होणे अशा लक्षणांवर उपयुक्त.
अल्युमिना- दोरीसारखा चिकट, घट्ट स्राव, अति प्रमाणात असलेला श्‍वेतप्रदर, दिवसा, जास्त त्रास होतो रात्री जरा तीव्रता कमी असते, अशा वेळी हे औषध वापरता येते.
क्रियोसोट- जंतूसंसर्गामुळे होणारा पिवळट हिरवा स्राव, उग्र वास येणे, कंबर अतिशय दुखणे, ओटीपोटात सूज येणे या लक्षणांवर उपयुक्त.
कॅलकेरिया कार्ब- लहान मुलींमध्ये होणार्‍या विशिष्ट प्रकारच्या श्‍वेतप्रदर विकारावर उपयुक्त.
बोरॅक्स- घट्ट दुधासारखा चिकट स्राव, गरमी होणे, पुरळ येणे अशावेळी उपयुक्त. वरील औषधे ही फक्त उदाहरणादाखल दिलेली आहेत. नुसती अशी माहिती वाचून स्वतःच औषधोपचार घेतल्यास तात्पुरताच आराम मिळू शकतो, काही वेळा चुकीच्या श्रेणीतील औषध घेतल्याने नाहक त्रास उद्भवू शकतात. त्याकरिता तज्ज्ञांच्या         सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.
निसर्गोपचार
माठ- माठाच्या (लाल भाजी) मुळाची साल पाव कप पाण्यात कोळावी. गाळून सकाळ- संध्याकाळ हे पाणी प्यावे.
पिकलेल्या उंबराची साल-किंवा पिकलेली सुकत आलेली दोन फळे घेऊन त्यात पाव चमचा मध व एक चिमट साखर घालून खावे.
मेथीदाणे- दोन मोठे चमचे मेथी दाणे, एक लिटर पाण्यात भिजवून ठेवाव्यात नंतर अर्धा तास हे पाणी आटवावे असा हर्बल टी (काढा) प्यायल्याने गुण येतो. भाताच्या पेजेमध्ये जिरे, खडीसाखर घालून प्यावे. डाळिंबाची साल, मोसंबीची साल, आवळा रस मिसळून गरम काढा पिण्याने श्‍वेतपदर कमी होतो. शिवाय आवळा, मोसंबी, गाजर व दूध यांचा आहारात योग्य वापर करावा.
अक्युप्रेशर- झोन थेरपीनुसार बिंदु क्रमांक अकरा ते पंधरावर दररोज सुमारे दोन- मिनिटे दाब द्यावा.
इतर- योग्य विश्रांती घेऊन श्रम कमी करावेत. शिळे, तळलेले पदार्थ, चहा, कॉफी, सुपारी असे पदार्थ वर्ज्य करावेत. चिंता, भय, शोक इत्यादीवर नियंत्रण ठेवावे. योग्य व्यायाम करावा. योगासने उत्तम , दगदगीचे प्रवास टाळावेत. स्वच्छता ठेवणे अतिशय आवश्यक असते. वापरायचे कपडे स्वच्छ धुतलेले, पूर्ण वाळलेले असावेत.Dr sonali sarnobat
संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक -9916106896
सरनोबत क्लिनिक-9964946818
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.