वर्षभरापासून कचरा आणि मातीने शहरातील गटारीची अवस्था दयनीय झाली होती. महानगरपालिकेने गटारी स्वच्छ करण्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. काही ठिकाणी गटारी सफाई करण्यात आल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नाही, मात्र पावसाने महानगरपालिकेचे काम हलके केले आहे.
मान्सूनचे जोरदार आगमन झाल्यामुळे गटारीतील सर्व कचरा वाहून गेला आहे. काही ठिकाणी असलेल्या गटारीतील मातीही बाहेर पडली आहे. तसे पाहता महानगरातील कचऱ्याची समस्या गंभीर होत असताना पावसाने मनपाला मदत केली असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी शहरात सुरुवातीच्या पावसात गटारी स्वच्छ करण्याचे काम वरून राजा करत असतो त्याच पद्धतीने गेल्या चार दिवसा पूर्वी झालेल्या पावसामुळे शहरातील बहुंताश भागतील कचऱ्याने भरलेल्या गटारींची सफाई झाली आहे.