जनता दल काँग्रेस संमिश्र सरकार मधील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद मिळावे यासाठी यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्री पद मिळावं यासाठी दबाव वाढत आहे.
ग्राम पंचायत सदस्य ते जिल्हा पंचायत उपाध्यक्षानी सतीश यांना मंत्री मिळावं म्हणून राजींम्याच अस्त्र बाहेर काढलेले असताना बेळगाव महा पालिकेच्या नगरसेवकाने चक्क महा पालिके समोर पाण्याच्या टाकीत बसून ठिय्या आंदोलन केले आहे.
प्रभाग 52 चे नगरसेवक डॉ दिनेश नाशिपुडी यांनी मंगळवारी सकाळी पालिके समोरील पाण्याच्या टाकी बैठक करून ठिय्या आंदोलन केले आहे.
महा पालिकेसमोर पाण्याची टाकी आणून त्यात बसून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केले आहे.या अगोदर सुद्धा पालिके समोर वेगळ्या स्टाईलने आंदोलन करून नाशिपुडी यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली होती आपल्या वार्डातील जनतेला पिण्याचे पाणी मिळू देत म्हणून वेगळं आंदोलन करत देखील ते चर्चेत होते.
सतीश जारकीहोळी हे गोर गरीब जनतेला सामावून घेऊन पुढे जाणारे नेतृत्व आहे अश्या नेतृत्वाकडूनच जण कल्याण होऊ शकतं त्यामुळं त्यांना मंत्री पदी नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी आंदोलन करत काँग्रेस हाय कमांड कडे केली आहे आपलं आंदोलन पाहून तरी वरिष्ठ नेतृत्वाला जाग यावी म्हणून वेगळ्या पद्धतीने सतीश प्रेम दाखवलं असल्याची प्रतिक्रिया नाशिपुडी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.