महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेल्या दीड हजार लोकसंख्येचे गाव म्हणजे महिपाळगड. मागील ७ दक्षकापासून हे गाव बीन सातबाऱ्याचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. निसर्गाच्या कुशीत आणि सीमेच्या वादात आजही येथील लोक झगडत आहेत. लढात आहेत आणि धडपडतायेत फक्त आणि फक्त आपल्या सातबाऱ्यासाठी….
पूर्वेला कर्नाटक हद्द आणि दक्षिणेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थानची मालकीची हद्द. यात गुरफटणाऱ्या आणि आजूबाजूने असलेल्या वनविभागाच्या कचाट्यात नागरिकांना सातबारा मिळत नसल्याने जमीन खरेदी आणि विक्रीचे व्यवहार आजही करताना पंचायत होत आहे.
या गावातील कुणाकडेच आपल्या घर किंवा शेतीची मालकी दाखविणारा सातबारा उतारा नसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर सरकार दरबारीही म्हणजेच महसूल किंवा भूमी अभिलेखा विभागाकडेही या गावाचा सातबारा नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या गावातील सातबारा नव्हे तर को कोणतीच कागदपत्राची नोंद नसल्याचे दिसून येत आहे.
सीमाभागातील नागरिक आज महिपाळगडकडे पर्यटन स्थळ म्हणून बघतात. मात्र येथील व्यथा मात्र महाराष्ट्रातील नेत्यांनि अथवा सीमाभागातील लोकप्रतिनिधिंनी दखल घेतली नसल्याचेच दिऑन येत आहे. जरी हे गाव महाराष्ट्रात असले तरी सिमभागाशी याचे घरचे संबंध आहेत. त्यामुळे येथील नेत्यांनी तरी लक्ष देणे गरजेचे आहे.
२०० हेक्टर परिसरात महिपाळगड विस्तरला आहे. मात्र महाराष्ट्राने झिडकारले आणि सिमभागाने वाऱ्यावर सोडले अशी अवस्था येतील नागरिकांची झाली आहे.