कंग्राळी खुर्द येथील रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याची तीन महिन्यात होत नसल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याची उचल ग्राम पंचायतने केली आहे.
कंग्राळी खुर्द येथे महापालिका की ग्राम पंचायत व्याप्तीत या हद्दीच्या वादात कचऱ्याची उचल गेली तीन महिने झाली नव्हती त्यामुळे संतप्त लोकांनी रात्री कचरा मुख्य रस्त्यावर फेकला होता.सकाळी कंग्राळी ग्राम पंचायत आणि आर आय पाटील यांच्या पुढाकाराने कचऱ्याची उचल करून स्वच्छता करण्यात आली.