माहिती खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बेळगावात एकही निपाह वायरस संशयित रुग्ण नसल्याचं स्पष्टीकरण दिल आहे.सोशल मीडिया वर निपाह चे संशयित असल्याच्या खोट्या बातम्या येत आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही या अफ़वा वर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
शहरातील शिव बसव ज्योती होमिओपॅथी कॉलेज मध्ये निपाह चे संशयित आहेत अशी बातमी सोशल मीडियावर वायरल झाली होती चार निपाह चे संशयित के एल इस्पितळात दाखल असून त्यांची स्थिती चिंताजनक अशी माहिती त्यात देण्यात आली होती.
केरळ आणि आसपासच्या स्थायीक असलेल्या के एल ई आणि इतर इस्पितळातील कर्मचारी विध्यार्थ्यांना आपल्या मूळ गावी जाऊ नये अशी ताकीत देण्यात आली असल्याची माहिती देखील माहिती खात्याने दिलेल्या पत्रकात दिली आहे.
सोशल मीडियात वायरल झालेल्या संदेशात निपाह बेळगावच्या 100 की मी परिघात पसरला आहे.जिल्हा प्रशासनाने वरील सर्व अफवाह असून जनतेने यावर विश्वास ठेवू नये आवाहन केले आहे अश्या चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.