स्वतःवर गोळी झाडून घेऊन बेळगावचे उद्योजक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने बेळगाववासीयांना मोठा धक्का बसला आहे. शैलेश यांनी आत्महत्या केल्याची बातमी बेळगाव live ने सर्वप्रथम देताच ही आत्महत्या झाल्याचे कारण काय? हा प्रश्न शैलेश यांना ओळखणाऱ्या प्रत्येकालाच पडला होता, त्याचे उत्तर त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मुळे मिळाले आहे.
स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांना व्यसनमुक्तीचा धडा देणाऱ्या या तरुण उद्योजकाने अचानक आपले जीवन संपविले आहे, माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्यापूर्वी लिहून ठेवले आहे, ही नोट पोलिसांच्या हाती लागली आहे.
मध्यरात्री दीड वाजता पाईपलाईन रोड गणेशपुर येथील स्वतःच्या घरी स्वतःच्याच रिव्हॉल्व्हर ने गोळी झाडून घेऊन त्यानी आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी मन घट्ट करून त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती, आपले पत्नी व मुलींवर खूप प्रेम आहे असेही त्यांनी त्यात लिहिले आहे.
माझ्या मृत्यूस मीच जबाबदार इतर कुणाचा दोष नाही, असे लिहीणाऱ्या शैलेश यांनी नेमक्या कोणत्या मानसिकतेतून हा निर्णय घेतला? हा प्रश्न निर्माण होत आहे.
मध्यरात्री घडलेली ही आत्महत्या साऱ्यासाठी धक्कादायक असून पोलीस दलाकडून पुढील तपास सुरू आहे.
[…] […]