मलप्रभा नगर वडगाव येथून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालक गणेश होसमनी याचा मृतदेह पोटे मळा येथील गोबर गॅसच्या गायरीत आढळला आहे.गेल्या पाच दिवसा पासून गणेशचा शोध घेतला जात होता मात्र शेवटी पोटे मळा येथेच त्याचा मृतदेह आढळला आहे.
मंगळवार दि २९ रोजी दुपार पासून तो आपल्या घरातून बेपत्ता झाला होता त्या नंतर पोटे मळ्यातील पडक्या विहिरी अग्निशामक दल,पोलीस आणि माजी महापौर अप्पासाहेब पुजारी यांच्या नेतृत्वात गाळ पाणी काढून शोध घेण्यात आला होता तिकडे काहीही सापडेल नव्हते. त्या नंतर पोलीस खात्याने देखील वेगळ्या अंगल ने या बालक बेपत्ता प्रकरणाचा तपास चालवला होता.
बुधवारी पोटे मळ्यातील पडक्या विहिरीच्या जवळच असलेल्या गोबर गॅसच्या गायरीकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते त्याच गायरीत पाच दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आहे. सी सी टी व्ही फुटेज मध्ये देखील गणेश त्या पडक्या विहिरीच्यादिशेने गेल्याचे आढळले होते मात्र गायरीत मध्ये पडला असल्याचे कुणाच्याही ध्यानात आले नाही. गणेश गोमुत्र घ्यायला गेला असावा आणि पाय सरकून टाकीत पडला असावा असा देखील संशय व्यक्त केला जात आहे.
घटना स्थळी शहापूर पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून त्या बालकाचे शव शल्य चिकित्से साठी पाठवण्यात आले आहे. पोटे मळ्यात मृतदेह पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.गोबर गस मध्ये गणेश कसा पडला याचा तपास देखील पोलीस करणार आहेत.
फार दुखद घटना आहे .