चाकूने भोसकून युवकाचा खून झाल्याची घटना शनिवारी काळी आठच्या सुमारास नेहरू नगर येथे उघडकीस आली. गणेश ऊर्फ बसवराज यल्लाप्पा काकती (वय 22, रा. नेहरूनगर पहिला क्रॉस) असे मयत युवकाचे नाव आहे. बसवराजकडे असलेला कॅमेरा त्याच्या मित्राने मागितला होता. परंतु तो देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले यातूनच चाकूने हल्ला केल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त केला आहे नेमके हेच कारण आहे की अन्य कोणते याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बसवराज हा सेल्समन म्हणून काम करतो. तो मूळचा गोकाक तालुक्यातील नेलगट्टी येथील असून तो नेहरू नगर बेळगाव येथे आपल्या मावशीकडे राहतो. शुक्रवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास तो जेवण करून फिरण्यासाठी बाहेर पडला त्यानंतर तो घराकडे परतलाच नाही. आज सकाळी आठ वाजता नेहरूनगर पहिल्या क्रॉसवरील पीके क्वाटर्सच्या खाली मृतदेह पडल्याचे दिसले. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तो मृतदेह बसवराजचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या छातीवर व पोटावर हल्ला करून त्याला दुसरीकडे नेऊन ठार मारले आणि त्याचा मृतदेह तिथे टाकण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलीस आयुक्त डॉ. डी सी राजप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.