वस्ती घरांचा उडालेला बोजवारा पाहून राज्य सरकारने यासाठी आता जिल्हा पंचायतींना जिल्ह्यातील उद्दिष्ट जाहिर केले आहे.महत्वाचे म्हणजे यासाठी आता नवीन गृहखात्री योजना सुरू केली आहे.
याबाबत जिल्हा पांच्यातीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर रामचंद्रन यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतीळ ५०६ ग्राम पंचायटीमध्ये ४२००० घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे उद्योग खात्री योजनेत ज्या कामगारांना काम मिळत नव्हते त्यांना आता गृहखात्री योजनेतून ९० दिवस काम देण्यात येणार आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे
राज्य आणि केंद्र सरकारने गृहखात्री योजना सुरू कवळी आहे. मागील वर्षीही ही योजना लागू करण्यात आली होती मात्र जागृती अभावी या योजनेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे आता नव्या जोमाने कामाला लागून उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात येणार आहे.