आपल्याला इतके कमी गुण मिळणार नाहीत याची त्याला खात्री होती. त्याने फेरतपासणीसाठी अर्ज केला आणि तो दहावीच्या परीक्षेत राज्यात पहिला आला आहे. काय आहे त्या बेळगावच्या मुलाची कहाणी?
दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२४ गुण मिळवून राज्यात दुसरा आणि बेळगाव जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान येथील सेंट झेवियर्सचा विद्यार्थी महंमद कैफ हारूनरशीद मुल्ला याने पटकावला होता.
महंमद कैफ याला विज्ञान विषय वगळता अन्य विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. विज्ञान विषयात त्याला ९९ गुण मिळाले. मात्र आपल्याला एक गुण कमी मिळेल यावर त्याचा विश्वास बसला नाही. त्याला विश्वास होता. विज्ञान विषयातही १०० पैकी १०० गुण मिळाले याचा. त्यामुळेच विज्ञान विषयाचा पेपर त्याने फेरतपासणीसाठी पाठवला होता.
त्याचा विश्वास खरा झाला आहे. त्याला विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. आता कर्नाटक राज्यात तो पहिला ठरला आहे. १०० टक्के गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला आहे.
महंमद मुल्ला याचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. वडील हारूनरशीद मुल्ला हे कित्तूर येथील शाळेत हिंदी शिक्षक तर आई न्यू गांधीनगर येथील सरकारी उर्दु माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत.
शिक्षणाबरोबरच त्याने सेंट झेवियर्स शाळेत एनसीसी बेस्ट कॅडेट अवॉर्ड आणि क्रीडा गुणात बेस्ट बॉय हे पुरस्कार मिळविले आहेत. शाब्बा्स …महंमद कैफ…..बेेळगावंचं नांव राज्यात उज्वल केलं…