चंद्र राशीवर आधारित साप्ताहिक भविष्य २० मे २०१८ ते २६ मे २०१८ या आठवड्यासाठी
मेष: व्यावसायिक स्थिति चढ-उतारांची राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या नौकरीविषयक प्रश्नांमधून शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कुटुंबावर वडिलधाऱ्यांचे वर्चस्व राहील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. प्रवासामधून आनंद मिळेल. कांही जणांना मानसिक चांचल्य जाणवेल. शुभ ता. २४, २५, २६.
वृषभ: उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत आर्थिक प्रश्न उद्भवतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाहीत. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २६.
मिथुन:
व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. वैयक्तिक कार्यातून सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २२, २३.
कर्क: उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढतीचे योग येतील. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना कष्टसाध्य यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांचा सल्ला उपयुक्त ठरेल. ओटी-पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २४, २५
सिंह: नौकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. व्यवसायात आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मित्र-मंडळींची साथ लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. शुभ ता. २२, २३, २६.
कन्या: व्यावसायिक आवक चांगली राहील, परंतु आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. वयस्कर लोकांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २४, २५.
तुळ: व्यावसायिक प्राप्तीत चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावराच्या कामात सफलता मिळेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २२, २३, २६.
वृश्चिक: उद्योग-व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. पत्रव्यवहारासाठी अनुकुलता राहील. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींवर महत्वाच्या कामात अवलंबून राहू नये. शुभ ता. २२, २३, २४, २५.
धनु: व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या नौकरीविषयक कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. कुटुंबात खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळविता येईल. शुभ ता. २४, २५, २६.
मकर: उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नौकरीमध्ये विनाकारण चिडचिडेपणा जाणवेल. संततीच्या आर्थिक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कांहींना मानसिक अस्थिरता जाणवेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २६.
कुंभ: नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. व्यावसायिक खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. संततीच्या बाबतीत विवाहासंबंधी कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. आई-वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. डोळ्यांच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासातून कामे होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २२, २३.
मीन: उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. मित्र-मंडळींशी वाद टाळावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. २२, २३, २४, २५.