Tuesday, April 30, 2024

/

बेळगावं जिल्ह्यात 76 टक्के मतदान

 belgaum

कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ विधान सभा मतदार संघात अत्यंत चुरशीने सरासरी ६९ टक्के मतदान झाले तर सर्वात अधिक मतदान 84 % सदलगा चिकोडी या मतदार संघात  तर सर्वात कमी मतदान61 %  बेळगावं दक्षिण या मतदार संघात झाले.बेळगावं उत्तर मध्ये 63 टक्के तर बेळगावं ग्रामीण मध्ये 76 टक्के मतदान झाले आहे

बेळगाव जिल्ह्यात एकूण १८ विधान सभा मतदार संघातील २०३ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे आता मंगळवारी १५ रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील आर पी डी कॉलेज मध्ये बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघांची मतमोजणी करण्यात येणार आहे.

Votingगेल्या आठवड्या पासून दररोज सायंकाळी वीज वादळ सह पाउस होत असल्याने आणि दुसरी कडे लग्नाचे अनेक मुहूर्त असल्याने लोकांनी सकाळच्या सत्रात मतदान अधिक करणे पसंत केले.

 belgaum

उतर मतदार संघात चुरस

उर्दू भाषिकांचा प्रभाव असलेल्या उत्तर मतदार संघात सकाळच्या सत्रात अत्यंत चुरशीने मतदान झाले होते दुपारी एक पर्यंत ४४ टक्के मतदान झाले होते या मतदार सघ बाबत सकाळच्या सत्रात मतदान करा टाकी वारी वाढवा असे सोशल मिडीयावर मेसेज फिरले होते त्याच परिणाम म्हणून सकाळच्या सत्रात उत्तर भागातील मतदान केंद्रावर गर्दीच्या रांगा होत्या. बूथ क्रमांक १८५ मध्ये चेहऱ्यावर बुरखा परिधा करून आलेल्या महिलेने महिला पोलिसांना बुरखा काढून चेहरा दाखवण्यास विरोध केल्याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. हनुमान नगर भागात ८ ते १२ या बूथ च्या व्याप्तीत घरातील सदस्य संख्ये पेक्षा अधिक मतदार असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी करून मतदान केंद्रा बाहेर निदर्शन केली.

गुलाबी बूथ संकल्पना

महिला मतदारांची मतदान संख्या वाढावी या उद्देशाने बेळगाव दक्षिण मतदार टिळकवाडी लेले मिदन संघात बूथ ११ तर उत्तर मतदार संघात बूथ जे एन एम सी बूथ क्रमांक ३३ गुलाबी बूथ करण्यात आले होते या दोन्ही बूथ मध्ये सर्व महिला मतदान कर्मचारी होते तर सर्व कर्मचाऱ्यानी गुलाबी साडी परिधान केली होती या बूथ मधून पुरुष मतदार जरी असले तरी महिला मतदारांना प्रोत्साहन म्हणून गुलाबी बूथ,सगळ्या खिडक्यांना गुलाबी पडदे,गुलाबी रंगाचे दरवाजे असे सर्वच गुलाबी करण्यात आले होते.

Pink booth

मतदानाची गुप्तता न पाळलेल्यावर केस

पोलिंग अधिकाऱ्याची नजर चुकवून मोबाईल द्वारे कुणाला मतदान केले याचा व्हिडियो वायरल करून गुप्त मतदान फोडलेल्या व्यक्तीवर क्रिमिनल केस दाखल करण्यात येणार आहे. उत्तर मतदार संघात एका व्यक्ती कडून मतदान करणारा स्वताचा व्हिडियो स्वत काढून वायरल करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतेल असून व्हिडियो वायरल केलेयचा व्यक्तीचा नाव पत्ता शोध घेतला जात आहे. उत्तर मतदार संघाचे निरीक्षक व्ही लोकेश यांनी प्रकान दाखल करून घेतेल आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.