रेल्वे स्टेशन वरील प्रीपेड रिक्षा बूथ कुचकामी ठरत आहे. येथे असणाऱ्या दराने रिक्षाचालक भाडे घेऊन जायला तयार नाहीत.फक्त नावाला ही सोय आहे की ती अंमलात आणणार हे कळत नाही.
प्रीपेड बुथवर ठरलेल्या दराने भाडे भरून तिकीट घेतल्यावर ते रिक्षा चालकाला दाखवावे लागते. त्या तिकिटावर लिहिलेल्या ठिकाणी रिक्षावाल्याने नागरिकाला नेऊन सोडले पाहिजे, पण हे तिकीट परवडत नाही वाढीव भाडे द्या तर जाऊया असे रिक्षावाले सांगत आहेत.
नागरिकांना आलेला हा अनुभव बेळगाव live ला सांगण्यात आला.
कुणीही वाढीव भाडे द्यायची गरज नाही, दर ठरलेले आहेत. असे सांगितले तरी एकही रिक्षावाला तयार होत नाही. बुथवर एकदा काढलेले तिकीट रद्द करता येत नाही.
निवडणुकीत अडकलेल्या अधिकाऱ्यांनी इकडे सुद्धा लक्ष द्यावे.