पदवीपुर्व शिक्षण विभागाने सोमवारी बारावीचा निकाल जाहिर केला, निकालामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हाची मोठी घसरण झाली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हा २९ व्या क्रमांकावर घसरला असून चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर आला आहे.
यंदा राज्याच्या निकालामध्येही घसरण झाली आहे. राज्याचा निकाल फक्त 59.56 इतका लागला तर बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 54.28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मंगळुर जिल्ह्याने प्रथम क्रमांक , उडपी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला. उत्तीर्ण होणाऱ्यामध्ये विद्यार्थीनींची संख्या जास्त आहे. उद्या सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये निकाल उपलब्ध होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती विधानसभा निवडणुकीमुळे बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती व निकालही लवकर जाहीर करण्यात आला आहे.