बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी म ए समितीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आज अर्ज दाखल केला. शक्तिप्रदर्शन करून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दिला आहे.
येथील हॉटेल पवन जवळच्या तालुका म ए समिती कार्यालयजवळून त्यांनी रॅली काढली होती. जुन्या मनपा कार्यालयात त्यांनी आपला अर्ज दिला आहे. मनोहर किणेकर आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या.
किणेकर हे २००४ साली निवडून आले होते. त्यानंतर २००८ व २०१३ साली सलग बंडखोरी मुळे त्यांचा पाडाव झाला. यावेळी त्यांना मताधिक्याने निवडून देणार अशी घोषणा त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.