Friday, April 26, 2024

/

शिवाजी सुंठकर पुन्हा समितीच्या वाटेवर…

 belgaum

सलग दहा वर्षे सत्तेपासून दूर, वैयक्तिक दुश्मणीचे राजकारण व इतर कारणांनी भाजप मध्ये जाऊन तेथेही काहीच साध्य न झाल्याने माजी महापौर शिवाजी सुंठकर आता पुन्हा समितीच्या मार्गावर आहेत.मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊराव गडकरी आणि तालुका समितीत मनोमिलन झाल्या नंतर एकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे याचाच परिपाक म्हणून समितीत एकी बाबत मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

Shivaji sunthkar

तालुका समितीत सहभागी होऊन समितीच्या अधिकृत उमेदवाराला निवडून देण्याचे योगदान त्यांना द्यावे लागेल, तरच त्यांना आपल्या पुनर आगमनाचे ध्येय साध्य करता येणार आहे.सुंठकर हे समिती निष्ठ होते, त्यांची वाट चुकली पण आता पाप धून काढण्याची संधी तुअन्न मिळणार आहे.

 belgaum

ग्रामीण मधून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात गेलेले शिवाजी सुंठकर यांना पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीत आणण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.राष्ट्रीय पक्षात मराठी माणसाला  त्यातल्या त्यात मराठा समाजाला काडीची किंमत दिली जात नाही हे सर्वश्रुत आहे त्यातच सुंठकराना उमेदवारी डावलून  भाजपने  हे दाखवून दिलं आहे अशी भावना वाढू लागली आहे.

मराठा समाजातून आलेल्या अनिल बेनके यांना उत्तर मतदार संघात पडीक सीट देऊन भाजप हाय कमांडने खिरापत दिल्या सारखं केलं आहे असा मत प्रवाह आहे त्यामुळं राष्ट्रीय पक्षांच्या नादाला न लागता सुंठकर यांच्या सारखे नेत्यांना स्वगृही परतण्याची ओढ लागली आहे.आजच्या घडीला सुंठकर यांच्या सारखा नेता स्वगृही आपल्या समाजा सोबत आल्यास समितीला ग्रामीण मतदार संघचं नव्हे तर उत्तर दक्षिण आणि खानापुरात देखील याचा फायदा होऊ शकतो.

Sunthkar arrest

शिवाजी सुंठकर यांना समितीत आणून त्यांचा फायदा मराठी साठी करून घेण्याच्या हालचालीना वेग आला आहे स्वतः समिती नेत्यांनी आणि सुंठकर समर्थकांनी या गोष्टीला दुजोरा देखील दिला आहे. जर का सुंठकर सारखे नेते निस्वार्थ भावनेने स्वगृही परतले तर राष्ट्रीय पक्षांची दैना उडून जाईल यात तीळ मात्र शंका नाही.सुंठकर साहेब वेळ अजूनही गेली नाही तुम्ही आमचेच आहात.तुमचं स्वागत करताना नम्रपणे हात जोडून हेकेखोर गिरी होणार नाही याची काळजी घेऊ….मातीशी ..रक्ताशी …आईशी…अस्मितेशी इमान दाखवण्याची वेळ आली आहे असं तळमळीचे आवाहन तुम्हाला बेळगाव live करत आहे..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.