बेळगाव शहरातील उत्तर व दक्षिण मतदारसंघात समितीचे एकच उमेदवार देण्यासाठी अंतिम चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी विशेष बैठक होणार आहे.
कै सुरेश हुंदरे स्मृती मंच चे अध्यक्ष राम आपटे व त्यांचे तीन सदस्य, किरण ठाकूर व दीपक दळवी तसेच त्यांचे प्रत्येकी चार सदस्य या बैठकीत उपस्थित राहणार असून यामध्ये बेळगाव दक्षिण व उत्तर साठी एकीने उमेदवार निवडणार आहेत.
आज झालेल्या स्मृती मंच च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शहरातील एकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
वडगांव येथे झालेल्या दोन्ही गटाच्या बैठकीत मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,प्रकाश मरगाळे,मालोजी अष्टेकर,राजाभाऊ पाटील महेश जुवेकर तर किरण सायनाक,पंढरी परब,किरण गावडे टी के पाटील हे उपस्थित होते.
कै.सुरेश हुंदरे मंच चे वकील राम आपटे यांच्या नेतृत्वाखाली सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.राजेंद्र मुतगेकर,गोविंद राऊत,मनोहर देसाई,युवराज हुलजी, महादेव चौगुले आदी कै सुरेश हुंदरे मंचचे सदस्य उपस्थित होते.शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर हे या बैठकीला उपस्थित नव्हते टाळाटाळ करत असल्या बद्दलजोरदार नाराजी व्यक्त केली.
एकी साठी प्रयत्न करू अशी भूमिका घेतलेले आमदार संभाजी पाटील यांना विश्वासात घेऊन निवड प्रक्रिया राबवावी अशी देखील मागणी केली जात आहे