महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रत्येक मतदार संघातील उमेदवार निवडीवरून समिती नेत्यांत असलेली मतभिन्नता दूर करण्यासाठी कै सुरेश हुंदरे स्मृती मंच ने बुधवार दि १८ रोजी समिती नेत्यांची बैठक बोलावली आहे.
किरण ठाकूर, टी के पाटील, पंढरी परब, किरण सायनाक, किरण गावडे तसेच दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विजय पाटील व महेश जुवेकर यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
वडगाव रोड बेळगाव येथील नवहिंद सोसायटीच्या कार्यालयात बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष राम आपटे यांनी केले आहे.