Saturday, December 21, 2024

/

ग्रामीण निवड बैठकीत सावळा गोंधळ

 belgaum

ग्रामीण विधान सभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखातीच्या बैठकीवेळी सावळा गोंधळ पहावयास मिळाला. इच्छुक उमेदवार रामचंद्र मोद्गेकर एस चौगुले आणि जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी सरचिटणीस एल आय पाटील अध्यक्ष निन्गोजी हुद्दार आणि राजा भाऊ पाटील यांच्याशी चर्चा करून निवड समितीत महिला आघाडी युवा आघाडी आणि लोकनियुक्त सदस्यांचा आम्हाला विश्वासात न घेता सामान्य बैठकीत ठराव न करता का समविष्ट केला असा जाब विचारला.taluka mes 1

निवड समितीत आम्हाला फिक्सिंगचा संशय येत असून त्यासाठी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत आहोत असे जाहीर करत लिखित अर्ज केले. अर्ज माघार घेऊन तिन्ही सदस्य बाहेर पडल्यावर एकीला प्रयत्नशील असलेल्या कृष्णा हुंद्रे यांनी दुसरा गट एकीसाठी ३२ जणांची कमिटीची नावे घेऊन या निवड कमिटीत येत असल्याचे सांगितले त्यामुळे परत गेलेले उमेदवार निवड समितीचे काय गौड बंगाल आहे हे पाहण्यासाठी परत आले त्यामुळे संघर्षाला वाचा फुटली तालुका समिती निवड समिती वरून गोंधळ झाला आणि शेवट पर्यंत होतच राहिला.

दुसऱ्या गटाचे सदस्य कधी येणार आहेत असा जाब कार्यकर्त्यांनी विचारतील म्हणून कृष्णा हुंद्रे बराच काळ गायब होते. शेवटी निवड समितीने गोंधळ होताच सर्व माघार घेतलेल्या आणि मोहन मोरे यांच्यासह पाच जणांना 137 पैकी 131 सदस्यांनी मतदान केलं. या दरम्यान च्या काळातच मोहन मोहन मोरे यांनी एकी झाली तरच अर्ज माघार घेतो अशी भूमिका जाहीर करून निघून गेले. शेवटी निवड समितीने पाचही उमेदवारांची मतदान घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.