भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बेळगाव भेट सलग दोनवेळा हुकली आहे, कालतर त्यांच्या दौऱ्यात वेळेचा हिशेबच चुकल्याने मोठा गोंधळ झाला आणि बेळगावचा कार्यक्रम न करताच त्यांना परत जावे लागले आहे, स्थानिक भाजप उमेदवार आणि समर्थकांची यामुळे निराशाच झाली.
दोन आठवड्यापूर्वी काही महत्वाच्या कारणामुळे शाह यांचा दौरा रद्द झाला. त्यावेळी निराश झालेल्या कार्यकर्ते व नेत्यांनी तो काल पुन्हा जुळवून आणला होता. पण एकाच दिवशी जिल्ह्याच्या सर्व टोकांना फिरवण्याच्या प्रकाराने शाह यांची दमछाक झाली आणि ते चिडलेही.
दौऱ्याचे नियोजन करणारे इराणा कडाडी आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर त्यांनी राग काढला. सर्व ठिकाणी उशीर केला गेला याचेही प्रमुख कारण नियोजनातील अभाव हेच पुढे आले आहे, यामुळे शहा यांना बेळगावातील विद्यार्थ्यांशी बातचीत कार्यक्रम रद्द करावा लागला आहे.
शहा यांनी आपल्या मतदार संघात येणे हा भाजपमधील उमेदवारासाठी शुभ शकुन मानला जातो, पण सलग दोनवेळा ते न आल्याने अपशकुनच झाला, आता ते बेळगावला येऊ नयेत म्हणून नियोजनात गोंधळ घातला अशीही चर्चा असून त्यांना जाणीवपूर्वक वेळ करून काहींनी मुद्दाम असे केल्याचे आरोपही होत आहेत.
तसं पहिला तर भाजपचे चाणक्य हे शहा बेळगावला येणे म्हणजे पक्ष संघटन आणि स्थानिक भाजपला ऊर्जा देणारे ठरलं असत मात्र शहा यांना बेळगाव शहराने हुलकावणी दिल्याने बेळगाव भाजप पुन्हा एकदा कम नाशिबी ठरला आहे