राज्य विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह गेले दोन दिवस उत्तर कर्नाटक दौऱ्यावर आहेत धारवाड आणि गदग जिल्हा आटोपून ते शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे
बेळगाव जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी कित्तुर मध्ये वीर नारी कित्तुर चन्नम्मा यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले बेळगाव जिल्हा प्रवेश केलायावेळी त्यांच्या सोबत प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा देखील उपस्थित होते.
कित्तुर सह शाह यांनी नंदगड येथील क्रांती वीर संगोळळी रायन्ना यांच्या स्मरकास देखील भेट दिली आणि अभिवादन केले. शाह कर्नाटकातील अनेक धार्मिक संस्था मठाना भेट देत आले आहेत भाजप साठी राज्यात पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न चालवला आहे.
बेळगाव जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजाच्या स्वातंत्र्य योध्दा वीर नारी कित्तुर चन्नम्मा आणि धनगर समाजाचे क्रांती कारी स्वातंत्र्य योद्धे संगोळळी रायन्न यांच्या स्मरकास भेट देऊन दोन्ही समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे ही एक राजकीय खेळी मानली जात आहे.
मुधोळ नंतर ते पुन्हा गोकाक मध्ये आणि निपाणीत रोड शो करणार आहेत या शिवाय रात्री के एल इ येथे मेडिकल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.