बेळगाव पोलीस उपायुक्त व विषेश दंडाधिकारी सीमा लाटकर यांनी सीमातपस्वी मधू कणबर्गी यांच्यावर काढलेल्या आदेशाविरोधात त्यांचे वकील महेश बिर्जे यांनी मधू कणबर्गी यांच्या वतीने आज मा. जिल्हा प्रधान सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन सदरचा आदेश हा बेकायदेशीर व एकतर्फी असून तो आदेश करताना कोणत्याही नियमांचे पालन न करता आदेश काढला आहे तो पूर्णता रद्द व्हावा अशी मागणी वकिल महेश बिर्जे यांनी मा.न्यायालयाकडे केली आहे.उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
याच प्रकारची याचिका महेश बिर्जे यांनी दीपक दळवी, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर तसेच निंगोजी हुद्दार यांच्या वतीने ११ वे जिल्हा सत्र न्यायालयात बेळगाव पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली होती.त्यावेळी ती याचीका मंजूर करुन मा.न्यायालयाने पोलीस उपायुक्तांचा तो आदेश रद्दबादल केला.
Trending Now