गोकाक मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार म्हणून धास्तावलेल्यानी भाजप कार्यकर्त्याना धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी केली आहे. गोकाक मध्ये कार्यरत निवडणूक पी डी ओ आणि तहसीलदारावर नजर ठेवावी अशी देखील अंगडी यांनी मागणी केली केली आहे.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोकाकमध्ये सरकारी अधिकारी राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरली आहे 13 रोजी अमित शाह गोकाक आणि निपाणीत रोड शो करणार आहेत तत्पूर्वी ते हुबळी गदग कित्तुर नंदगड मुधोळ येथील कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय
Trending Now