महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा सगळीकडे फडकविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दक्षिणचे आमदार संभाजी पाटील यांनी दक्षिण मतदार संघात यावेळी उमेदवारी मागणार नाही असे जाहीर केले आहे, तर समितीने संधी दिल्यास उत्तर मतदार संघात उमेदवार होण्याची तयारी दाखवली आहे, त्यांना समिती उत्तरेत उमेदवारी देणार का यावर चर्चा सुरू झाली आहे.
दक्षिणचे आमदार म्हणून संभाजी पाटील यांनी आपण केलेल्या कामाचा आढावा काल झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जाहीर केला आहे. उत्तर मतदार संघ हा मराठी आणि मुस्लिम मतदारांनी व्यापला आहे, दोन्ही समाजाशी आपले चांगले सबंध असून त्यांची मते घेण्याची आपली क्षमता आहे असे त्यांनी जाहीर केले आहे, आता यावर समिती नेते काय निर्णय घेतात, हे स्पष्ट नाही.
दक्षिण मतदारसंघात समिती जो कोणी उमेदवार देईल त्याला सर्व मराठी नगरसेवक आणि आमदार पाठींबा देणार आहेत.
Trending Now