खानापूर समितीत एकमत झालेय बेळगाव शहरात वातावरण अलबेल आहे मात्र गेली दहा वर्षे एकमेकां विरोधात लढलेले दोन्ही तालुका समितीतील नेते एकीच्या उंबरठ्यावर आहेत.
होय तालुका एकीकरण समितीतील दोन्ही गटात एकीसाठी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही समितीतील नेत्यांच्या एकी बद्दल दोन फेऱ्यात बोलणी झाली आहे.उद्या रविवारी देखील यावर साधक बाधक चर्चा केली जाणार आहे.
पावशे अष्टेकर गटाच्या नेत्यांनी एन डी पाटील गटाकडे निर्णय प्रक्रियेत समावून घ्या अशी मागणी केली त्यावर किती सदस्यांना समितीत स्थान देने यावर एकमत होणे बाकी आहे.दोन्ही गटातील नेत्यांनी उद्या पुन्हा बैठक होणार असून त्यात काय चर्चा होइल यावर एकी ठरणार आहे.दोन्ही गटातील नेत्यांनी हेखेखोर गिरी सोडून एक पाऊल मागे घेऊन एकी करा अशी मागणी वाढत आहे दोन्ही गटातील नेत्यांनी यात सहभाग घेतला होता.