Saturday, April 27, 2024

/

शस्त्रक्रियेवेळी किडनी काढून घेतली’ शंकर मुनवळ्ळी यांचा केएलई इस्पितळाविरुध्द गंभीर आरोप

 belgaum

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळविलेल्या बेळगाव केएलई संस्थेच्या डॉ.प्रभाकर कोरे इस्पितळात दिल्या जाणार्‍या उपचारासंदर्भात कॉंग्रेसचे नेते माजी केपीसीसी सदस्य शंकर मुनवळ्ळी यांनी इस्पितळाविरुध्द गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केला.

Shankar munvalli

मूत्रपिंडाच्या त्रासावर उपचार करण्याकरिता हे केएलई इस्पितळात दाखल झालो असता शस्त्रक्रिया करुन माझे मूत्रपिंड (किडनी) दुसर्‍या रुग्णाला बसविले असून केएलई इस्पितळातील डॉक्टर याला जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

 belgaum

केएलईतील डॉक्टर सिध्दलिंगेश्‍वर निली आणि डॉ. मल्लीकार्जुन करीशेट्टी (खानपेट), केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे व डॉ.एम.व्ही.जाली या सर्वांनी मिळून रोग नसतानासुध्दा माझ्यावर शस्त्रक्रिया करुन माझी किडनी दुसर्‍या रुग्णास बसविली असावी असा मला संशय वाटत असून या प्रकरणाबाबत डॉ.प्रभाकर कोरे इस्पितळाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे शंकर मुनवळ्ळी यांनी सांगितले.

केएलईमध्ये हुशार व तज्ञ डॉक्टरच नाहीत. लाखो रुपये डोनेशन देवून परिक्षेत कॉपी करुन डिग्री मिळविलेले डॉक्टर भरती करुन घेण्यात आले असून कोणताही आजार नसतानासुध्दा गंभीर आजार असल्याचे सांगत गरीब रुग्णांना घाबरवून त्यांची लूट केली जात आहे. या इस्पितळावर सरकारचे नियंत्रण नाही असे सांगत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपल्या उपचारासंदर्भात केएलईच्या डॉक्टरांनी कागदपत्रे दिली नसल्याचा आरोप शंकर मुनवळ्ळी यांनी केला.

राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी आपले वजन वापरुन ही बातमी वृत्तपत्र किंवा टीव्ही मिडीयावर प्रसारीत केली जावू नये म्हणून पत्रकारांवर दबाव आणला असावा. आपण बेंगळूरु व दिल्ली येथे पत्रकार परिषद घेवून सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करुन केएलई प्रभाकर इस्पितळाचा काळा धंदा उघडकीस आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

या प्रकरणाबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली तरी पोलीस निरीक्षक  कालीमिर्ची यांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही शिवाय पोलीस आयुक्त डॉ.डी.सी. राजप्पा यांनी सुध्दा कोणतीही कारवाई केली नसल्याबद्दल शंकर मुनवळ्ळी यांनी नाराजी व्यक्त केली व केंद्र सरकारने डॉ.राजप्पा यांचे आयपीएस पद काढून घ्यावे अशी मागणी केली.

पैशापेक्षा माणुसकी मोठी आहे. कितीही पैसे कमविले तरी ती संपत्ती इथेच सोडून जावे लागते. राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे हे गंभीर आजाराची भीती घालून निष्पाप लोकांकडून पैसे उकळत असल्याने त्यांना शाप लागल्याशिवाय राहणार नाही असे मुनवळ्ळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.