बेळगावातील मराठी संस्कृतीचा केंद्र बिंदूठरलेली शिव जयंती चित्र रथ मिरवणूक शनिवार १९ मे रोजी घेण्याचा निर्णय मध्यवर्ती शिव जयंती मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी सायंकाळी जत्तीमठात शिव जयंती महा मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते.
सध्या निवडणुकीची आचार संहिता सुरु असल्याने आगामी १९ एप्रिल होणारी मिरवणूक निवडणूक प्रक्रिया संपल्यावर शनिवारी १९ मे रात्री होणार आहे. बेळगावात दरवर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस शिव जयंती मिरवणूक घेण्याची परंपरा आहे यावर्षी आचार संहिता लागल्या मुळे १७ एप्रिल रोजी केवळ शिव जयंतीचे पूजन आणि राय गडा सह विविध गडा वरून आणलेल्या ज्योतींचे स्वागत होईल मात्र मिरवणूक मे महिन्यात आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीत प्रकाश मरगाळे,विजय पाटील,मदन बामणे,शिवराज पाटील,अरुण कानुरकर,रमाकांत कोंडुसकर,महादेव पाटील,सुनील जाधव,गुणवंत पाटील, दता उघाडे,महेश जुवेकर ,विकास कलघटगी आदी उपस्थित होते. बेळगाव च्या शिव जयंती मिरवणुकीस पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होतात त्यामुळे पुढील वर्षी जल्लोषात मिरवणूक साजरी करण्यासाठी वेगळी बैठक घेण्याचा देखील यावेळी ठरवण्यात आले. मागील वर्षी झालेल्या चित्ररथ मिरवणुकीत ढोल ताशा मुळे मिरवणुकीला विलंब होत आहे त्यामुळे ढोल ताशा साठी वेगळी स्पर्धा घ्यावी अशी मागणी काही शिव जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी केली.