काळ्या दिनाच्या सायकल फेरीत का सहभागी झाला म्हणून पाच मराठी नगरसेवक आणि एका आमदारांना कर्नाटक सरकारच्या नगरविकास खात्याने बजावलेल्या नोटिशीला त्याच भाषेत नगरसेवकांनी उत्तर दिले आहे.
१ नोव्हेंबर १९५६ साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेत बेळगाव सह मराठी भू भाग कर्नाटकात डांबण्यात आला तेंव्हा पासून बेळगावात १ नोव्हेंबर हा कला दिवस म्हणून पाळण्यात येतो तर दुसरीकडे कर्नाटक राज्योत्सव दिवस म्हणून कर्नाटक सरकार आयोजन करत असते.१ नोव्हेंबर २०१७ साली झालेल्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत नगरसेवक संज्योत बांदेकर,सरिता पाटील,किरण सायनाक,मोहनबेळगुंदकर,ज्योती चोपडे आणि पंढरी परब यांच्यसह आमदार संभाजी पाटील सहभागी झाले होते या घटनेच्या तब्बल सहा महिन्या नंतर पाच नगरसेवकांना नगरविकास खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्या नोटिशीला सर्व मराठी नगरसेवकांनी उत्तर दिले आहे.
प्रादेशिक आयुक्त पी ए मेघण्णावर यांच्या द्वारे निवेदन देऊन आणि नगर विकास खात्याच्या सचिवांना पोस्ट द्वारे नोटिसीचे उत्तर पाठवून दिले आहे.
मराठी भाषिकांनी एक नोव्हेंबर रोजी केलेलं काळ्या दिनाच आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात आहे १९५६ पासून ते मराठी भाषिक आंदोलन करत आलेत लोकशाहीत घटनेने दिलेल्या अधिकारा वापरून आम्ही आंदोलन केलेले आहे आम्ही आमच्या भावना काळ्या दिनात सायकल फेरीत सामील होऊन व्यक्त केल्या आहेत कर्नाटक सरकारच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन आम्ही केलेले नाही घटनेचा अनादर आम्ही केलेलं नसून राज्य सरकारने केलेला आरोप चुकीचा आहे कुठेही के एम सी कायदा सेक्शन १८ उल्लंघन केलेले नाही अस नोटिशीला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.