Thursday, January 2, 2025

/

भारत नगर मध्ये घराला आग

 belgaum

शहापूर येथील भारत नगर पहिला क्रॉस येथे मुलाने स्वतःच्या घराला आग लावल्याचा प्रकार आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  गणेश वामन आरोंदेकर या युवकाने आईने खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर रॉकेल ओतून आग लावली. त्यामुळे काही वेळातच कौलारू घराला आग लागली. आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, गणेशच्या आई पार्वती या प्रकारामुळे घाबरून गेल्या आहेत. पार्वती यांना 4 मुली असून त्यांचे लग्न झाले आहे. तर गणेशची पत्नी गर्भवती असून ती सध्या माहेरी गेली आहे. पतीच्या निधनानंतर पार्वती यांनी काबाडकष्ट करून संसार उभा केला होता

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.