खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीतील वाद मिटवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जेष्ठ नेते वकील राजाभाऊ पाटील यांनी नियुक्ती केली आहे.आगामी विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर खानापुरात एकास एक उमेदवार व्हावा या दृष्टीकोनातून मध्यवर्तीने राजाभाऊ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
नुकताच बेळगावात झालेल्या शरद पवारांच्या सभे नंतर आमदार अरविंद पाटील आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांची जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या समक्ष मध्यवर्ती सदस्यांनी बैठक घडवून आणली आणि त्या बैठकीत या वादावर तोडगा काढण्यात आला आहे.
मंगळवारी मध्यवर्तीच्या बैठकीत अध्यक्ष दीपक दळवी यांनी राजाभाऊ पाटील यांनी खानापूर समितीच्या निरीक्षक नेमले असल्याचे जाहीर केल. खानापूर समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर पाटील राहणार असून एकूण ३९ जणांची कमिटी नेमण्यात येणार आहे यात जुन्या ३३ जण सदस्यांचा समावेश आहे. जे सदस्य मयत झाले आहेत त्या ठिकाणी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून निरीक्षक राजाभाऊ पाटील हे बैठक बोलावणार आहेत.
मध्यवर्ती समितीच्या बैठकीत सदस्य परमेकर यांनी खानापूर समितील वाड मिटवावा आणि मध्यवर्तीने बैठ्कीत्खुलालासा करावा अशी मागणी केल्यावर दीपक दळवी यांनी वरील माहिती दिली. जगन्नाथ बिर्जे यांनी निवडून येणारा प्रबळ उमेदवाराच्या मागे सर्वांनी रहाव आणि शरद पवार यांनी आमदारांची संख्या वाढवा अस केलेल्या आवाहनास प्रतिसाद ध्यावा अशी मागणी केली. तर आमदार अरविंद पाटील यांनी २००८ साली केवळ एक जिल्हा पंचायत सदस्य असलेला आज खानापुरात तीन जिल्हा पंचायत सदस्य ,तालुका पंचायत आणि ए पी एम सी वर मराठीची सत्ता असल्याची माहिती दिली.