Tuesday, April 30, 2024

/

शरद पवारांना भावना दाखवू-तालुका समिती बैठकीत निर्णय

 belgaum

बेळगाव महाराष्ट्राचेच अजूनही बेळगावकर जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे लाखोंच्या उपस्थितीने शरद पवारांना दाखवून देऊ अश्या भावना अनेकांनी बोलून दाखवल्या.

Mes meeting

शनिवारी सायंकाळी मराठा मंदिरात आगामी 31 मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्वच नेत्यांनी जनतेने उपस्थित राहून भावना दाखवु असं आवाहन केलं.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार,माजी आमदार मनोहर किणेकर,सचिव एल आय पाटील,खजिनदार एस एल चौगुले, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे उपस्थित होत्या.
प्रत्येक गावात ग्राम पंचायत स्तरावर बैठका घेऊन जास्तीत जास्त युवा कार्यकर्त्यांना जमवू आणि सीमा प्रश्नाची सोडवणूक करून घेऊ अशी मते अनेकांनी मांडली.
बेळगाव प्रश्नाची सोडवणूक पवारांनी तोडगा काढून केली होती मात्र  समिती नेत्यांनी तोडगा अमान्य केला होता. पवार यांच्या सारखे ग्रेट मराठा नेतृत्व सीमा वासीयांच्या पाठीशी आहेत यामुळे प्रश्नाची तड लागण्यास वेळ लागणार नाही असे मत बी बी देसाई यांनी मांडले.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.