Friday, November 22, 2024

/

सविताने हृदय देऊन फेडले समाजाचे ऋण

 belgaum

जन्माला आली तेंव्हापासूनच तिच्या शरीरात रक्ताची कमतरता भासत होती. जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवसापासूनच तिला महिन्यातून एक दोनदा बाहेरून रक्त द्यावे लागायचे. मृत्यू येईपर्यंत हे सुरूच राहिले.तिचे  ब्रेन डेड झाल्याचे समजताच तिची आई व बहीण पुढे आल्या, त्यांनी तिच्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव दान देण्याची तयारी दर्शविली आणि उत्तर कर्नाटकातील पहिली ह्रदयरोपण शस्त्रक्रिया येथील डॉ. प्रभाकर कोरे केएलईएस हॉस्पीटलमध्ये होऊ शकली आहे.

Heart transplant
हॉस्पीटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली व डॉ. प्रभाकर कोरे यांनी पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. मयत सविताच्या हृदयाचे ठोके या महा दानामुळे सतत सुरू राहतील आणि हे हृदय प्राप्त झाल्याने एका कुटुंबाचा आधार वाचवता आला आहे.

कर्नाटकात बंगळूर वगळता अन्य कोठेही अशी शस्त्रक्रिया झालेली नाही. अथणी येथील ३२ वर्षीय वीरगौडा पाटील यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. २० फेब्रुवारी रोजी हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा डॉ. रिचर्ड साल्ढाणा यानी केला. मध्यरात्री दोन ते सकाळी ८ पर्यंत सलग सहा तास हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर यश आले असे सांगून नव्या हृदयाशी समरस झालेल्या विरगौडाशी विडिओ काँफरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला.

ब्रेन हॅमरेजमुळे त्रस्त 42 वर्षीय सविता पवार या महिलेचे ह्रदय त्यांच्या कुटुंबियानी दान करण्याचा निर्णय घेतला. त्या ह्रदयाचे रोपण वीरगौडा पाटील यांच्यावर करण्यात आले. खासदार डॉ. प्रभाकर कोरे यानी या शस्त्रक्रियेची माहिती दिली. अवयवदान हे अत्यंत विधायक कार्य आहे, त्यासाठी नागरीकानी पुढे यावे असे आवाहन केले. तसेच हे हृदय देणाऱ्या सविताच्या आईचा सत्कारही त्यांनी केला. देवदयेने तुम्हाला निरोगी जीवन लाभो अशी प्रार्थना करून तसे काही झालेच तर केएलई संस्था मोफत उपचार करेल असे त्यांनी सांगितले.

मंगावती (ता. अथणी) येथील वीरगौडा पाटील याला या शस्त्रक्रियेमुळे पुनरूज्जीवन मिळाल्याचे कोरे म्हणाले. केवळ पाच लाख रूपयांमध्ये ही शस्त्रक्रिया केल्याचेही ते म्हणाले. बाहेर या शस्त्रक्रियेला २० ते २५ लाख खर्च येतो, आम्हाला सात ते साडेसात लाख येईल त्यापैकी दोन अडीज लाख आम्ही संस्थेच्या वतीने भरू, पाच लाखात हृदय प्रत्यार्पण करू. फक्त नागरिकांनी अवयव दानासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
विरगौडाची आई, बहीण व इतर कुटुंबीयांनी यावेळी सविताच्या कुटुंबाचे आभार मानले. पत्रकार परिषदेत सर्वच भावुक झाले होते. साऱ्यांचाच डोळ्यात पाणी तरळले, विशेषतः सविता हिच्या कुटुंबास हृदय दान करण्यास प्रवृत्त करण्यास प्रयत्न करणारे भाजप नेते किरण जाधव हे व इतर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.