कर्नाटक पाणीपुरवठा विभागाने उन्हाळा ऐन भरात येत असताना एक पत्रक दिले आहे. बेळगाव शहरात १ एप्रिल पासून पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या ४ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.
पावसाळा सुरू होईपर्यंत याच प्रमाणे ५ दिवसातून एक वेळ पाणी दिले जाईल कारण राकसकोप जलाशयातील पाणी कमी कमी होत चालले असून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती या पत्रकात आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास खासगी विहिरी व तलावांचा वापर केला जाणार आहे, अशा ठिकाणांचाही शोध प्रशासनाने सुरू केला आहे.
प्रत्येक विभागासाठीचे वेळापत्रक बनवून हे नवीन धोरण राबविले जाणार असून सध्यातरी याशिवाय पर्याय नाही असेच पत्रकात लिहिले असून नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
Trending Now