संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे
यांच्यावर घातलेल्या खोट्या केसीस मागे घ्याव्यात, कोरेगाव भीमाची दंगल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रकाश आंबेडकर, उमर खालिद, जिग्नेश मेवाणी, सुधीर ढवळे यासारख्या नक्षल समर्थकांवर पोलिसांनी कारवाई करावी.
व भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे प्रत्यक्ष तिथे नसताना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी केस घालणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून कारवाई व्हावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्या वतीने संभाजीराव भिडे गुरुजी सन्मान मोर्चा काढण्यात आला .
धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कडून जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा प्रमुख किरण गावडे शहर प्रमुख
अजित जाधव, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील,तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, यांचा सह संगम काक्केरी, नगरसेविका सरिता पाटील, सुद्धा भातकांडे, पंढरी परब, रतन मासेकर, किरण सायनाक, धनंजय जाधव, विलास पवार, रमाकांत कोंडुसकर यांच्या सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.