मंगळवारी निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊन आचार संहिता जारी झाली यामुळे आता हळू हळू वातावरण गरम होत जाणार आहे. याच हंगामात यात्रांची घाईगडबड आल्याने उमेदवारांचीही वेगळ्या पद्धतीने सोय होणार आहे.
मार्च च्या शेवटच्या आठवड्यात मुचंडि येथील सिद्धेश्वर यात्रा आली आहे, याच बरोबरीने एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात येळ्ळूर येथील चांगळेश्वरी देवीची यात्रा होणार आहे.
कडोली येथील लक्ष्मीची यात्रा २४ ते २८ एप्रिल काळात ठेवण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीच्या जेवणावळी भरवण्याची नामी संधीच उमेदवारांना मिळत आहे.