कर्नाटक विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आणि संपूर्ण निवडणूक कार्यक्रम आज सायंकाळ पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्नाटकात दोन टप्प्यात निवडणूक होणार असून बेळगाव जिल्ह्याचा समावेश पहिल्याच टप्प्यात असणार आहे.
अधिकृत घोषणा आज सायंकाळी होणार असल्याचे कळले आहे, काही सूत्रांकडून बेळगाव live कडे उपलब्ध माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उमेदवार निश्चिती आणि चिन्ह वाटप प्रक्रिया होणार आहेत तर मी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार आहे.
५ मे पर्यंत पहिल्या टप्प्यातील निवडणूक होऊ शकेल या टप्प्यात बेळगावसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे तर उर्वरित भागांच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत.
सध्या सर्वच पक्षांची उमेदवार निवडीची कामे सुरू आहेत, काही पक्षांनी उमेदवार निवडले असून अधिकृत घोषणा बाकी आहे. बऱ्याच ठिकाणी वादही आहेत. निवडणूक जाहीर झाली की वादांवर तोडगे काढून महिन्याभराच्या आत उमेदवार अर्ज दाखल करून प्रचार सुरू करावा लागणार आहे यामुळे आता इच्छूक आणि त्यांच्या समर्थकांच्या झोपा मोडणार आहेत.
