स्पाईस जेट कंपनीच्या नव्या बेळगाव हैद्राबाद विमानसेवेचा प्रारंभ आजपासून झाला. आज बेळगाव मध्ये या विमानाचे भव्य स्वागत करण्यात आले.
या विमानतळावरून आता एक पाच विमानांची सोय राहणार आहे. पहिल्याच दिवशी ४० प्रवासी घेऊन विमान बेळगावला दाखल झाले.
प्रकाश कालबाग या पहिल्या प्रवाशास फीत कापण्याचा मान देण्यात आला. प्रत्येक प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शाळकरी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
सांबरा विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी ही ऐतिहासिक घटना असून उडाण योजनेंतर्गत आता या विमानतळाचा लवकरच समावेश होईल असे त्यांनी सांगितले.