Sunday, December 29, 2024

/

लग्नासाठी आग्रही असलेल्या प्रेयसीचा डॉक्टरकडून खून

 belgaum

नगरच्या नर्सचा खानापुरात खून-

लग्न करून घेण्यासाठी वारंवार मागणी करणाऱ्या नर्स प्रेयसीचा डॉक्टर प्रियकरा कडून  खून केल्याची घटना खानापूर तालुक्यात उघडकीस आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आस्टोळी गावा जवळ रेल्वे उड्डाण पुला मागच्या मंगळवारी युवतीचा मृतदेह आढळला होता  पुनम ब्राह्मणी वय 22 रा.अहमदनगर असे त्या मयत युवतीचे नाव आहे.या प्रकरणी सुनील विश्वनाथ चव्हाण  व त्याचा भाऊ संजय चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Nurse murder
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील आणि पूनम या दोघांच्यात प्रेम संबंध होते पूनम सुनील सोबत लग्न करण्यासाठी आग्रही होती वारंवार लग्नाची मागणी करत होती मात्र सुनील दुसऱ्या जातीचा असल्याने लग्न करायला टाळाटाळ करत होता सुनील याने आपला भाऊ संजय याच्या सोबत पुनमचा खून करण्याचा बेत रचला आणि गोवा फिरायला जायचा बहाणा करून  रेल्वेनं गोव्या कडे आणून खून करून तिचा मृतदेह आस्टोली रेल्वे उड्डाण पुलात फेकून दिला होता. खानापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत दोघांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.