2002 पासून हलगा जुने बेळगाव वडगाव येथील 150 एकरहून अधिक सुपीक जमीन बळकावून हलगा मच्छे बायपास करण्याचा राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्र सरकारने जो घाट घातला आहे तो बंद करा असा ठराव असा महत्वपूर्ण ठराव जुने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या मेळाव्यात मांडला.
मंगळवारी सायंकाळी जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिराच्या आवारात झालेल्या मेळाव्यात मांडण्यात आला.जुने बेळगाव येथील समितीचे कार्यकर्ते संतोष शिवणगेकर यांनी ठराव मांडला.
गेली 62 वर्ष बेळगावातील जनता लोकशाही मार्गाने लढत असून बेळगाव शहरासह 865 खेडी महाराष्ट्रात सामील करा असा देखील ठराव सर्वांनूमते संमत करण्यात आला.हजारो मराठी भाषिकांनी मेळाव्यास उपस्थिती लावली होती. हजारो मराठी भाषिकांनी टाळ्या वाजवून ठराव संमत केला.
कोल्हापूर जिल्हा पंचायत सदस्य धैर्यशील माने , माजी सनदी अधिकारी दिनेश ओउळकर समिती अध्यक्ष किरण ठाकूर आमदार मनोहर किणेकर,मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी,सरचिटणीस मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे,वडगाव जुने बेळगाव भागातील नगरसेवक,समिती नेते उपस्थित होते.