परीक्षा सुरू असताना विजेचा खेळ खंडोबा तापदायक ठरत आहे. उकाडा जोरात असताना वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होताहेत.
मागील आठवड्यापासून ही परिस्थिती सुरू आहे. नेमक्या मुलांच्या अभ्यासाच्या वेळी वीज गायब होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत, यामुळे जुन्या काळाप्रमाणे कंदील आणि चिमण्या घेऊन अभ्यास करावा लागत आहे.
उकाडा आणि डास त्रास देत असताना वीज गायब झाली की असह्य होत असून हेस्कॉमने नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी जनता करत आहे.