लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक असा दर्जा देण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सोमवारी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
कर्नाटक अल्पसंख्याक कायदा 2 d अंतर्गत ही शिफारस करण्यात येणार आहे. लिंगायत आणि विरशैव लिंगायत धर्माची शिफारस करण्याचा निर्णयही झाला. लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनाना राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी बळ दिले आहे. आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यशासनाने धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेऊन लिंगायतांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस च्या कार्यकाळातच जैन धर्मास अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला होता आता काँग्रेसने लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माची शिफारस करत अल्पसंख्याक दर्जा देखील दिला आहे.
बसव सेनेनं केलं स्वागत
राज्य सरकार ने लिंगायत वेगळ्या धर्माच्या मागणीला प्रतिसाद देत या समाजास वेगळा धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची शिफारस केल्याचा निर्णयाचा बेळगावात जल्लोषी स्वागत करण्यात आल आहे बसव सेनेच्या वतीनं जल्लोष करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या निर्णयाच स्वागत करण्यात आलं आहे