हरिभाऊ खटाव हे ९० वर्षांचे गृहस्थ, पण आजही त्यांचे सायकलिंग सुरू आहे. आवड आणि पॅशन असली तर माणूस कोणत्याही वयात काहीही करू शकतो याचेच हे उदाहरण आहे.
मंगल कार्यालय सहायता नावाने टेबल, खुर्ची व इतर वस्तू पुरवण्याचे काम ते करत आले आहेत. उत्तर कर्नाटकात त्यांचे नाव चांगले आहे.
४० वर्षे आपला उद्योग सांभाळून ते निवृत्त झाले. आता ते आपला वेळ सामाजिक कामासाठी घालवतात. सिटीझन फोरम आणि बेळगाव जेष्ठ नागरिक संघ या संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत.
लष्करी जवानांसाठी सायकल वरून फिरून ते देणगी गोळा करतात. त्यांची सायकल इंग्लड मेड आहे. या सायकल ला एक बास्केट असून त्या माध्यामातून ते रोज आपल्या समवयस्क मित्रमंडळीसाठी न्याहरी घेऊन जातात.
आजही सायकल हे त्यांचे वाहन आहे. शतकाच्या उंबरठ्यावरील हरिभाऊ युवकांसाठी आदर्श व प्रेरणाच आहेत.