महा पालिकेत मराठी जणांचे सर्वात मोठं पद भूषवणाऱ्या उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी एक वेगळा संदेश देत समितीच्या सर्व नेत्यांचे एकत्र फोटो लावत गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावला आहे. महात्मा फुले रोड एस पी एम रोडवरील चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे.
31 मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या बेळगावातील सभेच्या अगोदर समिती नेत्यांत असलेली दुही मिटून सगळे जण एकत्र यावेत अशी भावना प्रत्येक मराठी माणूस व्यक्त करत असताना उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी विजयाची गुडी उभारणारा एकीचा बॅनर लावत जनतेचं लक्ष वेधलं आहे.
‘एकीचे बळ आणि मिळते फळ’असा फलकावर मजकूर असून आमदार संभाजी पाटील, मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांचे फोटो बॅनरवर एकत्रित रित्या लावले आहेत.
समितीतले पाईक एकीकडे एकीसाठी प्रयत्न करत असताना उपमहापौर सारख्या दुसऱ्या फळीतील नेत्या कडून देखील बॅनर द्वारे एकीसाठी प्रयत्न होत आहेत. आगामी काळात वरच्या फळीतील नेते एकत्र येणार का? उपमहापौर सारख्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश मिळणार का हाच महत्वाचा प्रश्न आहे.