गेल्या काही वर्षांत अनेक तलावाना पुनरुज्जीवन देत थेंब थेंब पाण्याचे महत्व सांगून बेळगावात पाणी वाचवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या प्यास फौंडेशनने आता उन्हात पाणी कमी असल्याने पक्षांना पाणी देण्याचं देखील कार्य सुरू केलं आहे.
उन्हाळ्यात पक्षांना जास्त पाणी लागते, ते मिळाले नाही तर पक्षांचा तडफडून जीव जाण्याचा धोका असतो,यासाठी गरज असते पक्षांसाठीच्या पणपोईची. ही गरज ओळखून मेड क्रिएटिव्ह वर्क्स या संस्थेने टाकाऊ प्लास्टिक बाटल्यापासून पक्षांसाठी पाणपोई बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा विशेषतः लहान मुलांसाठी आहे.
रविवारी सकाळी १० वाजता हनुमान नगर येथे रिद्धीज मेगा किचन हॉटेल जवळ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती उन्हाळ्यात पक्षांना पाणी देऊन पक्षीजीवन वाचवण्यासाठी मुलांमध्ये जागृती होऊ देत म्हणून हा उपक्रम हाती घेतला होता.
प्यासच्या वतीनं पाणी घालून ठेवण्यासाठी टाकाऊ बाटल्यांची पाणपोई बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली तसेच मुलांनाही ते बनवण्याची संधी दिली मुलं पाणपोई बनवणे शिकली इतरांनाही शिकवतील अस प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं 100हुन अधिक मुलांनी या कार्यशाळेत सहभाग दर्शवला होताअशी माहिती प्यास चे डॉ माधव प्रभू यांनी दिली.